पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय बालिकेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:32 IST2022-11-30T11:32:25+5:302022-11-30T11:32:33+5:30
पोलिसांनी शेजारच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते.

पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय बालिकेवर बलात्कार
बेमेतारा (छत्तीसगड) : मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागलेल्या १७ वर्षीय मुलाने शेजारच्या १० वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला. छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात पाठवले आहे.
पोलिसांनी शेजारच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते. अश्लील चित्रफीत पाहून तो बालिकेच्या घरी गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला. नंतर गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने मुलीला फास देऊन लटकवले.