अल्पवयीन मुलीवर वाशिम येथे अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

By रवींद्र चांदेकर | Updated: August 5, 2022 21:01 IST2022-08-05T21:00:23+5:302022-08-05T21:01:52+5:30

पीडित मुलगी मामाच्या गावाला जात असताना घडला प्रकार

A minor girl was raped in Washim and a case was registered against two people | अल्पवयीन मुलीवर वाशिम येथे अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर वाशिम येथे अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

रवींद्र चांदेकर, यवतमाळ-महागाव: तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी वाशिम येथील लॉजवर नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजू ऊर्फ श्यामसिंग भैरवसिंग ठाकूर (२५), रा. भईसागर, ता. कोट्टा (राजस्थान), ह.मु. पोखरी, ता. महागाव आणि शेख नाझीम शेख इमाम (२५), रा. धनोडा, अशी आरोपींची नावे आहेत. २ ऑगस्ट रोजी पीडिता वडिलांसह मामाच्या गावाला जाण्यासाठी हिवरा बसस्थानकावर आली. तेथे वडील बाजूला हॉटेलवर चहा पिण्यास गेले. दरम्यान, मुलीची ओळख असलेला श्यामसिंग ठाकूर आणि त्याचा मित्र शेख नाझीम शेख इमाम हे दोघे दुचाकीने तेथे आले. त्यांनी तिला जबरीने दुचाकीवर बसवून पुसदमार्गे वाशिम येथे नेले. तेथे बस स्टँड जवळील एका लॉजमध्ये नेऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने शारीरिक अत्याचार केला.

यानंतर त्या मुलीला आरोपींनी पुसद येथील शिवाजी चौकात आणून सोडले. दोघांनी तेथून पोबारा केला. पीडित मुलीने वसंतनगर पोलीस ठाणे गाठून आपबीती कथन केली. नंतर यवतमाळ पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले. दोन्ही आरोपी महागाव तालुक्यातील असल्याने येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा वळता करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title: A minor girl was raped in Washim and a case was registered against two people