अल्पवयीन मुलीला प्रसाद खाऊ घालून केले बेशुद्ध, पुजाऱ्याने बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:49 IST2022-03-30T21:45:25+5:302022-03-30T21:49:42+5:30
Rape Case :येथून दोन्ही मुलींना फरिदाबाद येथे नेण्यात आले. फरीदाबादमध्ये दोन्ही मुलींना एका पुजारी बाबाच्या घरी ठेवण्यात आले होते.

अल्पवयीन मुलीला प्रसाद खाऊ घालून केले बेशुद्ध, पुजाऱ्याने बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडिओ
पाटणा : शहरातील राजीव नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जयप्रकाश नगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या मुलीचाही सहभागआहे. शेजारी राहणार्या मुलीने पूजेसाठी बसण्यासाठी आणि पैशाचे आमिष दाखविल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर ती २७ फेब्रुवारीला पाटणाहून शेजारच्या मुलीसह बनारसला पोहोचली. येथून दोन्ही मुलींना फरिदाबाद येथे नेण्यात आले. फरीदाबादमध्ये दोन्ही मुलींना एका पुजारी बाबाच्या घरी ठेवण्यात आले होते.
नोटांची उशी ठेवून अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला
अल्पवयीन मुलीने सांगितले की, पुजारी बाबाच्या घरी प्रार्थनास्थळ बांधले होते. मुलीला पूजास्थळी बसवण्यात आले. मग प्रसादाच्या नावाने काहीतरी खायला दिले. यानंतर अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली. नंतर पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. एवढेच नाही तर पुजार्याने नोटांचे बंडल मुलीजवळ ठेवून अश्लिल व्हिडिओ बनवला. त्याचवेळी पीडितेला दोन दिवस पुजाऱ्याकडे ठेवल्यानंतर तिला बनारसला परत आणण्यात आले. इथून पीडिता कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि पाटणा गाठले.
पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली
पीडितेचा आरोप आहे की, तिच्या शेजारची मुलगी प्रियंका पुन्हा बनारसला जाण्यासाठी दबाव टाकत होती. यानंतर पीडितेने या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी 28 मार्च रोजी राजीव नगर पोलिस स्टेशन गाठले. पीडितेचा आरोप आहे की, प्रियंका वेश्या व्यवसाय करते आणि गरीब कुटुंबातील मुलींची लक्ष्य करते. राजीव नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या प्रियांकाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत अल्पवयीन पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून पोलीस आरोपी पुजारी बाबाचा शोध घेत आहेत.