दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:51 IST2025-05-01T11:48:55+5:302025-05-01T11:51:38+5:30
Crime News Latest: पोलिसांना नाल्यात एक मृतदेह सापडला. मृत व्यक्तीचा गळा चिरलेला होता. पोलिसांनी तपास केला. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आणि सगळा प्रकार उजेडात आला.

दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
Marathi Crime news: तीन दिवसापूर्वी एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नाल्यात आढळून आला. व्यक्तीचा गळा सडलेला होता. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. दिल्लीपोलिसांसमोर व्यक्तीची हत्या कोणी आणि का केली? असा प्रश्न होता. पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करताना एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आणि सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाल्यात ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, त्या व्यक्तीचे नाव आहे जगविंदर सिंघानिया. सिंघानियाच्या दुचाकीला एका कारचा धक्का लागला. त्यामुळे त्याच्या दुचाकीवर असलेली दारूची बाटली फुटली. त्यानंतर जे घडलं, थेट सिंघानियाच्या हत्येवरच त्याचा शेवट झाला.
जगविंदर सिंघानिया १३ एप्रिलपासून होते बेपत्ता
पोलिसांनी सांगितले की, जगविंदर सिंघानिया १३ एप्रिलपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २७ एप्रिल रोजी दिल्लीतील बक्करवाला भागात एका नाल्यात सापडला. सिंघानिया गोपाल नगरमधील सुरुखपूर मार्ग परिसरात राहत होता. त्यांच्या पत्नीने १४ एप्रिल रोजी हरिदास नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
वाचा >> २६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले
१३ एप्रिल रोजी जगविंदर सिंघानिया घरातून निघाले होते. दुचाकी घेऊन ते गेले, पण परत आले नाही. तपास सुरू केल्यानंतर सिंघानियांची दुचाकी नजफगड परिसरात बेवारस स्थितीत आढळून आली. त्यानंतर त्याच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बघितले, त्यात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीच्या चालकासोबत जगविंदर सिंघानिया बोलत असल्याचे दिसून आले.
स्कॉर्पिओ गाडीत बसले अन्...
सीसीटीव्हीमध्ये सिंघानिया हे आपली दुचाकी उभी करून हेल्मेट आणि बॅग घेतात आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. ही गाडी नंतर नांगलोईच्या दिशेने निघून गेली. व्हिडीओ पत्नीला दाखवण्यात आल्यानंतर ते जगविंदर सिंघानिया असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेहाची अशी पटली ओळख
रणहोला पोलीस ठाणे हद्दीत एका नाल्यात मृतदेह आढळला. त्यांच्या पॉकेटमध्ये आधार कार्ड होते. त्यावरून त्यांची ओळख पटली. या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला.
दारूची बाटली फुटली, नंतर दोघे सोबत दारू प्यायले
पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीचा शोध सुरू केला. तीन संशयित स्कॉर्पिओ शोधण्यात आल्या. तपास करत पोलीस बापरोला येथील व्यक्तीपर्यंत पोहोचले. तो खासगी बँकेत कॅशियर आहे. २८ वर्षीय रोहित कुमार सिंह याच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि संशय खरा ठरला. त्यानेच सिंघानियाची हत्या केली होती. त्याला पोलिसांनी अटक केली.
आरोपीने सांगितले की, सिंघानीयाच्या दुचाकीला गाडीचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवर ठेवलेली दारूच्या बाटल्या फुटल्या. दोघांमध्ये वाद जाला. पण नंतर दोघांचा वाद मिटला. ते इंदिरा मार्केटमध्ये गेले, तिथून दारु खरेदी केली. सोबत दारू प्यायले.
दारु प्यायला नंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की रोहितने सिंघानियाची हत्या केली. हे प्रकरण दाबण्यासाठी त्याने नंतर मृतदेह बक्करवाला परिसरातील नाल्यात नेऊन टाकला.