खळबळजनक! ठाण्यातील खाडीत पडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:09 IST2022-07-28T18:09:07+5:302022-07-28T18:09:28+5:30
Death Case :या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खळबळजनक! ठाण्यातील खाडीत पडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
ठाणे: खाडीजवळ शौचालयासाठी गेलेल्या पाच वर्षीय रुद्र आदमाने या चिमुकल्याचा खाडीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गायमुख खाडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गायमुख गावातील एक मुलगा गायमुख खाडीत पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी कासारवडवली पोलीस , आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहन तसेच एका रुग्णवाहिकेसह दाखल झाले. खाडीत पडलेल्या रुद्र याला खाडीमधून बाहेर काढून उपचारासाठी ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.