गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:50 PM2022-01-18T21:50:09+5:302022-01-18T21:51:06+5:30

Missing Case : पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला.

A commotion broke out in the village, the bodies of 3 yrs old girl who had been missing for 9 days were found | गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

Next

गोगुंडा: राजस्थानातील गोगुंडा येथे गेल्या ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षीय चिमुकली विमला हिचा मृतदेह मंगळवारी उदयपूर जिल्ह्यातील गोगुंडा पोलीस स्टेशन परिसरात आढळून आला. घराजवळील नाल्यात विमला यांचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांच्या माहितीवरून गोगुंडा पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयात पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला. 

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले

गोगुंडा पोलिस स्टेशनचे अधिकारी कमलेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन हद्दीतील पटिया गावात राहणारी ३ वर्षांची निष्पाप मुलगी ९ जानेवारीच्या संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह रुग्णालयात पाठवला. विमलाचे वडील प्रताप लाल गमेटी यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्या घराजवळील रस्त्यावर टॉवर बसवण्याचे काम सुरू होते.

यादरम्यान ते आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले आणि तिला तिथे खेळणाऱ्या मुलांसह सोडून टॉवर उभारण्याच्या कामात मी मग्न झालो. काम संपल्यानंतर परतल्यावर विमला तेथे सापडली नाही. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या मुलांनाही विमलाबाबत कोणतीही माहिती देता आली नाही. यानंतर विमलाचा ​​घरी व परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही.

यावर गोगुंडा पोलिस ठाण्यात विमला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले. मात्र, विमलाचा ​​कोणताही सुगावा लागला नाही. त्याचवेळी आता विमला यांचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Web Title: A commotion broke out in the village, the bodies of 3 yrs old girl who had been missing for 9 days were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app