चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:57 IST2025-07-25T18:55:08+5:302025-07-25T18:57:27+5:30
Ahmedabad Student News: अहमदाबादमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
Ahmedabad Student Died: ती चौथ्या मजल्यावरील पॅसेजमधून चालत जात आहे. हातात असलेली चावी फिरवत फिरवत पुढे जाते. पुढे गेल्यानंतर चौथ्या मजल्यावरील संरक्षक कठड्यावरून खाली उडी मारते. एका शाळेत घडलेल्या या घटनेचा अस्वस्थ करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अहमदाबाद शहरातील एका खासगी शाळेत विद्यार्थिनी शिकत होती. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गुरूवारी शाळेतच चौथ्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले. खाली पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिच्या हात आणि पायांनाही गंबीर इजा झाली होती. तिचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून, मित्र-मैत्रिणीकडेही तिच्याबद्दल चौकशी करत आहेत.
विद्यार्थिनीची आत्महत्या, घटनेचा व्हिडीओ
अहमदाबाद: छात्रा ने चौथी मंजिल से लगाई छलांग
— Journalist Deepika singh (@Deepikasingh043) July 25, 2025
स्कूल में 10वीं कक्षा की छात्रा ने लगाई छलांग
चौथी मंजिल से कूदने के बाद छात्रा की हुई मौत
सोम ललित स्कूल की छात्रा ने की खुदकुशी#SuicideVideo#Ahmedabad#suicidevideo#studentsucide#sucidenews#sucide#bignews#Breakingnewspic.twitter.com/z04vkdcMXe
विद्यार्थिनी महिनाभर होती सु्ट्टीवर
आत्महत्या केलेली विद्यार्थिनी अहमदाबादमधील नवरंगपुरा भागातील सोम ललित शाळेत शिकत होती. लीना १५ दिवसांपासून शाळेत यायला लागली होती. त्यापूर्वी ती महिनाभर सुट्टीवर होती. आजारी असल्याचे प्रमाणपत्रही तिच्या वडिलांनी शाळेत जमा केले होते.
वडील तिला शाळेत सोडून गेले अन...
गुरूवारी सकाळी तिचे वडील तिला शाळेत सोडून गेले होते. काही वेळ बसल्यानंतर ती अचानक ओरडू लागली. शिक्षकेने तिला शांत केले होते. तिच्या काही मित्र-मैत्रिणींनी सांगितले की, ती कुठल्यातरी गोष्टीमुळे सकाळपासून त्रासलेली होती. पण, तिने याचे कारण कुणालाही सांगितले नाही. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर तिने उडी मारून आत्महत्या केली.