बालविवाहास रोख! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईसह मामावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:50 IST2022-07-08T18:49:43+5:302022-07-08T18:50:22+5:30

Child Marriage :मुलीच्या तक्रारीवरून आई व मामावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

A case has been registered against a mother and her uncle for marrying a minor girl | बालविवाहास रोख! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईसह मामावर गुन्हा दाखल

बालविवाहास रोख! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईसह मामावर गुन्हा दाखल

सदानंद नाईक 

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका येथे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न स्वतःच्या आई व मामाने गुजरात येथील एका तरुणा सोबत लावल्याचा प्रकार उघड झाला. मुलीच्या तक्रारीवरून आई व मामावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका परिसरात सोनू ही महिला कुटुंबासह राहते. सोनू या महिलेने भाऊ गुरुनाथ जागले याच्या मदतीने स्वतःच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड काढून तीचे गुजरात येथील तरुणाशी लग्न लावण्याचा घाट घातला. २५ जून रोजी अल्पवयीन मुलीला नेऊन गुजरात येथे रमेश नाथांनी यांच्या सोबत लग्न लावून दिले. त्यानंतर मुलीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून पोलिसांना झालेला प्रकार कथन केला. मुलगी अल्पवयीन असतांना, मुलीचे वय जास्त दिसण्यासाठी आईने बनावट आधारकार्ड काढले. त्या आधारकार्ड वरील वयावरून मुलीचे लग्न लावून दिले. पोलिसांनी आई सोनू व मामा गुरुनाथ जागले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered against a mother and her uncle for marrying a minor girl