शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दणका; कोर्टाने ठोठावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:17 IST

Gunratna Sadavarte Remand extended : कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार आहे. 

एसटी संपकऱ्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्याबाजुने लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते  Gunratna Sadavarte यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत. दरम्यान गिरगाव कोर्टात सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना वाढीव पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांचे  युक्तिवादाद्वारे प्रयत्न सुरु आहेत. तर सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी यास प्रतिवाद सुरु केला होता. घरत यांनी ११ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार आहे. 

युक्तिवादात घरत यांनी कोर्टात सांगितले की, एका मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केलेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी १०.३० पासून व्हाॅटस अप चॅटिंग आहेत. या दोघांत  व्हाॅटस अप काॅल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला, त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही. सदावर्ते यांनी युनियनकडून पैसेही गोळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1 कोटी 55 लाखांहून अधिकची रक्कम गोळा केली आहे. काहीजण यामागे आहेत, जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. गेली ६ महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. ५३० रुपये प्रत्येक एसटी कर्मचा-यांकडून गोळा केले गेले. जवळपास दीड कोटी रुपये रक्कम जमा आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूरमधून  व्हाॅटस अप कॉल झाले होते. नागपूर कॉल नंतर 'पत्रकार पाठवा' चा मेसेज करण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल करण्यात आले. हा सुनियोजित कट होता. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे. मोहम्मद शेखने व्हॉट्स अप मेसेज केले आहेत. बॅनर पण तयार केले होते असून सावधान शरद ...सावधान शरद असे बॅनर तयार करण्यात आले. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे. सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींगसाठी एक बैठक झाली होती. जमा केलेल्या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत, हे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ४ नवीन अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. आरोपी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार या चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. आणखी मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे. 

अभिषेक पाटील, सविता पवार, मोहम्मद शेखसह चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु असल्याचे घरत यांनी न्यायालयात सांगितले. नागपूर कॉल नंतर 'पत्रकार पाठवा' चा मेसेज आला होता. यानंतर पत्रकारांना फोनाफोनी झाली आणि आंदोलनावेळी बोलविण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल झाले. हा सुनियोजित कट होता, असा दावा घरत यांनी करताना मोहम्मद शेखने व्हॉट्सअॅप मेसेजचा त्यांनी हवाला दिला. 

यामध्ये शेखने सावधान शरद ...शरद  असे बॅनर तयार करण्यात आल्याचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे, असा दावा देखील घरत यांनी केला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिल