१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:59 IST2025-06-21T21:58:17+5:302025-06-21T21:59:13+5:30

पूनम नावाच्या ४५ वर्षीय महिलेचे तिच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या कृष्ण कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

A 45-year-old woman fell in love with a man 14 years younger than her, and killed her husband without anyone even suspecting it! | १४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!

१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पूनम नावाच्या ४५ वर्षीय महिलेचे तिच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या कृष्ण कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. पूनमच्या पतीला, अनूप सिंह यादवला, या संबंधांबद्दल संशय आल्याने त्याने आक्षेप घेतला आणि दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून पूनमने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. 

हत्येनंतर, या घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संपूर्ण सत्य समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार या दोघांना अटक केली आहे.

गोहाणा येथे आढळला मृतदेह
झुंझुनू येथील गोहाणा परिसरातील पचेरी रोडवर १० जूनच्या रात्री एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख अनूप सिंह यादव अशी पटली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अनूपच्या मुलीने सुरुवातीला वडिलांच्या मृत्यूचा अहवाल रस्ते अपघातामुळे झाल्याचे नोंदवले होते. चौकशीदरम्यान, पोलिसांनी अनूपची पत्नी, ४५ वर्षीय पूनम हिची कसून चौकशी केली. यासोबतच, पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा केले, ज्यांच्या आधारे पूनमचा प्रियकर कृष्ण कुमार याला अटक करण्यात आली.

क्रूर हत्येचे रहस्य उलगडले!
पोलिसांनी पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार यांची कसून चौकशी केली असता, संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांनी पोलिसांना सांगितले की, १० जून रोजी अनूप घरी पोहोचला. रात्री तो फिरायला बाहेर पडला. रस्त्यात त्याची कृष्ण कुमारशी भेट झाली आणि अनूपने कृष्ण कुमारला दारू पिण्यास बोलावले. त्यानंतर दोघांनी दारू पार्टी केली. दारूच्या नशेत असतानाच कृष्ण कुमारने अनूपच्या छातीवर लोखंडी हातोड्याने वार केले आणि बेदम मारहाण केली, ज्यामुळे अनूपचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कृष्ण कुमारने अनूपचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि तिथून पसार झाला. या संपूर्ण घटनेला अपघात भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

प्रेमसंबंध आणि हत्येचे कारण
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, कृष्ण कुमार हा पूनमपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. तो महिलेच्या घरी टँकरने पाणी पुरवण्याचे काम करत होता. २०१८ मध्ये पूनम आणि कृष्ण कुमार यांची भेट झाली होती. त्यावेळी कृष्ण कुमार २४ वर्षांचा होता. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध जुळले.

अनूप घरी नसताना कृष्ण कुमार पूनमच्या घरी येऊ लागला. पोलिसांनी सांगितले की, पूनम आणि कृष्ण कुमार यांच्यात सात वर्षांपासून अनैतिक संबंध होते. कृष्ण कुमारचे सध्याचे वय अंदाजे ३१ वर्षे आहे. पूनमशी त्याची भेट झाली तेव्हा तो २४ वर्षांचा होता. गेल्या चार महिन्यांपासून अनूपने नोकरी सोडून घरीच राहत होता. यामुळे कृष्ण कुमार आणि पूनमला भेटण्यात अडचणी येत होत्या.

काही काळापूर्वी अनूपला पूनम आणि कृष्ण कुमारच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती मिळाली. यावर अनूपने जोरदार विरोध केला. यामुळे पूनम आणि अनूपमध्ये रोजच वाद होऊ लागले. पूनमने आपल्या प्रियकर कृष्ण कुमारसोबत मिळून अनूपला वाटेतून बाजूला करण्याचा कट रचला. पोलीस तपासात समोर आले की, ९ जून रोजी पूनम आणि कृष्ण कुमारने अनूपला संपवण्याची योजना तयार केली आणि १० जून रोजी त्यांनी या घटनेला अंमलात आणले.

पोलिसांनी पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी चौकशीनंतर अनूपच्या हत्येसाठी वापरलेला हातोडाही जप्त केला आहे.

Web Title: A 45-year-old woman fell in love with a man 14 years younger than her, and killed her husband without anyone even suspecting it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.