ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:17 IST2024-09-20T18:13:10+5:302024-09-20T18:17:17+5:30

Thane Crime News in Marathi : बदलापूर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या ठाणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. एका नराधमाने शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या वर्षाच्या मुलीसमोर बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. 

A 38-year-old man raped a neighbor woman in front of her daughter in Thane | ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार

ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार

Thane Latest News : काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत लहानग्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे ठाणे जिल्हा चर्चेचा विषय ठरला होता. आणखी एक संतापजनक घटना जिल्ह्यात घडली असून, शेजारी राहणाऱ्या नराधमाने एका महिलेवर हातपाय बांधून बलात्कार केला. पीडितेच्या तीन वर्षाच्या मुलीसमोर आरोपीने हे कृत्य केले. भायंदरमध्ये ही घटना घडली. 

३८ वर्षीय आरोपीचे कृत्य 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजता आरोपी पीडित महिलेच्या घरात शिरला. त्यावेळी पीडिता तिच्या तीन वर्षाच्या मुलीसह घरात होती. 

घरात आल्यानंतर आरोपीने महिलेवर हल्ला केला आणि ओढणीने तिचे हात-पाय बांधले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि झालेली घटना सांगितली.

पोलीस म्हणाले की, आरोपीने महिलेवर हल्लाही केला होता. 38 वर्षीय आरोपीने पीडितेवर अत्याचार केला, तेव्हा तीन वर्षाची मुलगीही तिथेच होती. महिलेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊ तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका १३ वर्षाच्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. आरोपींने लग्न करतो असे सांगून अनेकवेळा बलात्कार केला. जेव्हा अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने तिला मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणातील आरोपी सध्या अटकेत आहे. 

Web Title: A 38-year-old man raped a neighbor woman in front of her daughter in Thane