२० वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 21:00 IST2022-02-02T21:00:05+5:302022-02-02T21:00:43+5:30
Suicide Case : कोमल हिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

२० वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य
जळगाव : के.सी.पार्क परिसरातील भारत नगरात वास्तव्याला असलेल्या कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय २०) या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. कोमल हिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
घरी कोणी नसताना कोमल हिने आत्महत्या केली आहे. शेजारी राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीच्या हा प्रकार लक्षात आला. शेजारी तसेच नातेवाईकांनी तिला तातडीने शासकिय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी तिला मृत घोषित केले. कोमल हिचे वडिल चालक असून आई मजुरी करते. दोन भाऊ व एक विवाहित बहिण आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा