‘मी बालजीनगरचा भाई आहे... म्हणत १७ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:30 IST2022-07-29T17:29:11+5:302022-07-29T17:30:29+5:30
Stabbing News : या प्रकरणी आदित्य बंडू फरतडे (वय १७, बालाजीनगर) याने फिर्याद दिली. पोलिसांनी फारुख उर्फ फऱ्या सत्तार शेख (वय २४, बालाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘मी बालजीनगरचा भाई आहे... म्हणत १७ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : किरकोळ भांडणातून १७ वर्षीय तरुणावर ‘मी बालजीनगरचा भाई आहे. तुला जीवंत ठेवत नाही” असे म्हणत कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवार (दि.२७) बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी येथे दुपारी तीनच्या सुमारास घडली.
या प्रकरणी आदित्य बंडू फरतडे (वय १७, बालाजीनगर) याने फिर्याद दिली. पोलिसांनी फारुख उर्फ फऱ्या सत्तार शेख (वय २४, बालाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादील मी बालाजीनगरचा भाई आहे आता मी तुला मारून टाकतो, असे म्हणत फिर्यादीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्यात फिर्याद जखमी झाला आहे.