धक्कादायक! फ्रीजमधून पाणी बॉटल चोरल्याचा राग, १४ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:40 IST2023-06-01T13:39:59+5:302023-06-01T13:40:41+5:30
मिरर युके रिपोर्टनुसार, पोलिसांनी म्हटले की, तुम्ही कोणालाही पाठीमागून गोळी मारू शकत नाही.

धक्कादायक! फ्रीजमधून पाणी बॉटल चोरल्याचा राग, १४ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या
क्षुल्लक कारणावरुन एका १४ वर्षांच्या मुलाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. सायरस कारमॅक-बेलटन असं या व्यक्तीचं नाव असून अमेरिकेच्या दक्षिणी कॅरोलिना येथील ही घटना आहे. दुकानदाराला रविवारी रात्री संशय आला की, या मुलाने त्याच्या दुकानातून पाण्याच्या ४ बॉटलची चोरी केली आहे. मात्र, सायरसने दुकानातून पाण्याच्या बाटल्या चोरल्या नव्हत्या, केवळ फ्रीजमध्ये वापस ठेवल्या होत्या, त्यानंतर दुकानातून पळून जात असताना त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिरर युके रिपोर्टनुसार, पोलिसांनी म्हटले की, तुम्ही कोणालाही पाठीमागून गोळी मारू शकत नाही, जोपर्यंत तो तुमच्यासाठी धोकादायक असणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपी रिक चाऊ यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत मुलाच्या मृतदेहापासून बंदुक जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चाऊचा मुलगाही सहभागी असल्याची माहिती आहे. त्यानेच चाऊला सायरसकडे बंदूक असल्याची माहिती दिली होती. मात्र, सायरसने चाऊ किंवा त्याच्या मुलावर बंदुक रोखल्याचा कुठलाही पुरावा नाही.
आरोपी चाऊजवळ हत्यार बाळगण्याचा परवाना आहे, मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर आली असून मुलाच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव असून लोकांनी विरोधात प्रदर्शनही केलं आहे.