शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:30 IST

हवेली तहसील कार्यालयामार्फत सोलापूर रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती़.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना गुंगारा देत ४८ लाख १८ हजार ६०० रुपयांचे ९ ट्रक चोरुन नेल्याची फिर्याद ९ ट्रकपैकी ५ ट्रक पुण्यातील असून अहमदनगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती येथे अन्य ४ ट्रकची नोंदणी

पुणे : महसुल विभागाने कारवाई करुन जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरुन नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. विशेष म्हणजे त्यात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ट्रकचा समावेश आहेत़. याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी तेजस्विनी मंगेश साळवेकर (वय ३९, रा़ ग्रीन व्हॅली, बावधन) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितल्यानुसार, हवेली तहसील कार्यालयामार्फत सोलापूर रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती़. सोमवारी १ आॅक्टोंबरला तेजस्विनी साळवेकर यांच्या नेतृत्वाखाली या वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यात येत होती़. त्यांनी दुपारी साडेतीन वाजता शेवाळवाडी येथे यातील ९ ट्रकवर कारवाई करुन ते ताब्यात घेतले व एका ठिकाणी ते उभे करण्यास सांगण्यात आले़ त्यांच्यावर कारवाई करुन ती शेवाळवाडी येथे एका ठिकाणी ठेवण्यात आले होते़. त्यानंतर सायंकाळी आणखी काही ट्रक वाळू वाहतूक करीत असल्याचे समजल्यावर हवेली महसुलचे कर्मचारी सोलापूर रोडवर आले असताना या सर्वांनी हे ट्रक घेऊन कर्मचाऱ्यांना गुंगारा देत ४८ लाख १८ हजार ६०० रुपयांचे ९ ट्रक चोरुन नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे़. या ९ ट्रकपैकी ५ ट्रक पुण्यातील असून अहमदनगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती येथे अन्य ४ ट्रकची नोंदणी करण्यात आली आहे़. अहमदनगर, सोलापूरमधील ट्रक पुण्यात बेकायदा वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले आहे़. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड अधिक तपास करत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPoliceपोलिसsandवाळू