शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! ७६ व्या वर्षी वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा हट्ट, विरोध करणाऱ्या लेकावरच झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:39 IST

राम यांना पुन्हा लग्न करायचं होतं, परंतु त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा लग्नाला विरोध होते.

गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७६ वर्षीय राम बोरीचा यांनी दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केली. राम यांना पुन्हा लग्न करायचं होतं, परंतु त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा लग्नाला विरोध होते. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात वडिलांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर वडिलांना कोणताही पश्चात्ताप नव्हता. 

राम बोरीचा यांची पत्नी २० वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना आता पुन्हा लग्न करायचं होतं. पण त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांना विरोध करत होते. कारण त्यांना वाटतं होतं की यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा खराब होईल. या कारणावरून घरात अनेकदा भांडणं होत असत.पोलिसांनी आरोपी वडिलांना घटनास्थळावरून अटक केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्रतापची पत्नी जया तिच्या सासऱ्यांना चहा देण्यासाठी गेली असता, राम बोरीचा यांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर राम यांनी जयाला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती कशीबशी निसटली. प्रतापचा मुलगा जयदीप घरी आला तेव्हा त्याला त्याचे वडील रक्ताने माखलेले आढळले, तर त्याचे आजोबा जवळच असलेल्या टेबलावर बसले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राम यांना अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले पिस्तूलही जप्त केलं आहे.चौकशीदरम्यान, राम यांनी आपल्या मुलाच्या हत्येबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या व्हिडीओ जबाबात त्यांनी म्हटलं आहे की, मुलाने त्यांना खूप त्रास दिला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसmarriageलग्न