भयंकर! ७६ व्या वर्षी वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा हट्ट, विरोध करणाऱ्या लेकावरच झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:39 IST2025-03-12T16:38:34+5:302025-03-12T16:39:02+5:30
राम यांना पुन्हा लग्न करायचं होतं, परंतु त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा लग्नाला विरोध होते.

भयंकर! ७६ व्या वर्षी वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा हट्ट, विरोध करणाऱ्या लेकावरच झाडल्या गोळ्या
गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७६ वर्षीय राम बोरीचा यांनी दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केली. राम यांना पुन्हा लग्न करायचं होतं, परंतु त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा लग्नाला विरोध होते. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात वडिलांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर वडिलांना कोणताही पश्चात्ताप नव्हता.
राम बोरीचा यांची पत्नी २० वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना आता पुन्हा लग्न करायचं होतं. पण त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांना विरोध करत होते. कारण त्यांना वाटतं होतं की यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा खराब होईल. या कारणावरून घरात अनेकदा भांडणं होत असत.पोलिसांनी आरोपी वडिलांना घटनास्थळावरून अटक केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
प्रतापची पत्नी जया तिच्या सासऱ्यांना चहा देण्यासाठी गेली असता, राम बोरीचा यांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर राम यांनी जयाला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती कशीबशी निसटली. प्रतापचा मुलगा जयदीप घरी आला तेव्हा त्याला त्याचे वडील रक्ताने माखलेले आढळले, तर त्याचे आजोबा जवळच असलेल्या टेबलावर बसले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राम यांना अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले पिस्तूलही जप्त केलं आहे.चौकशीदरम्यान, राम यांनी आपल्या मुलाच्या हत्येबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या व्हिडीओ जबाबात त्यांनी म्हटलं आहे की, मुलाने त्यांना खूप त्रास दिला होता.