पोलीस चक्रावले! 7 वर्षांच्या मुलाचा सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेश हैराण

By हेमंत बावकर | Published: October 21, 2020 09:00 AM2020-10-21T09:00:19+5:302020-10-21T09:01:36+5:30

Juvenile Rape Case: मंगळवारी न्याय बोर्डाचे सर्व सदस्य हजर नसल्याने सुनावनी बुधवारी घेण्याचा निर्यण घेण्यात आला. कथित बलात्काराचा अल्पवयीन आरोपी व त्याच्या कुटुंबाला त्याच्या घरी पाठविण्यात आले होते.

7-year-old boy rapes 6-year-old girl; Uttar Pradesh shocked | पोलीस चक्रावले! 7 वर्षांच्या मुलाचा सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेश हैराण

पोलीस चक्रावले! 7 वर्षांच्या मुलाचा सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेश हैराण

Next

बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरलेले असताना आता एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. क्वार्सी क्षेत्रातील सात वर्षाच्या एका मुलाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलाच्या वयाची चाचणी घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रकरणी अल्पवयीन न्याय बोर्ड निर्णय घेणार आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. 


या प्रकरणी बोर्डाच्या समोर पीडित मुलीचा वैद्यकीय चाचणी अहवाल ठेवला जाणार आहे. अलिगढ पोलीस हा अहवाल देणार आहे. यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. क्वार्सी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री मुलीची आई आणि नातेवाईक आले होते. त्यांनी शेजारी भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका मुलावर बलात्कार केल्याचा आरोप लावला. 


मंगळवारी न्याय बोर्डाचे सर्व सदस्य हजर नसल्याने सुनावनी बुधवारी घेण्याचा निर्यण घेण्यात आला. कथित बलात्काराचा अल्पवयीन आरोपी व त्याच्या कुटुंबाला त्याच्या घरी पाठविण्यात आले होते. आज पुन्हा त्यांना बोलविण्यात आले आहे. आज सुनावणीवेळी मुलीचा वैद्यकीय अहवाल अभ्यासला जाणार आहे. 


एसपी सीटी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन न्याय बोर्डाने या प्रकरणी सुनावणीसाठी बुधवारची तारिख दिली आहे. बुधवारी या न्याय बोर्डाकडून जी प्रक्रिया अवलंबली जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. 
या प्रकरणामुळे अलीगढचे लोक हैरान झाले आहेत. आरोपीचे वय 7 वर्षे असल्याने हे प्रकरण सोडविताना पोलिसांचीही पुरती भंबेरी उडणार आहे. 
 

हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा', एक आरोपी निघाला अल्पवयीन

उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. तपासासोबतच आता कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तपासादरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा' करण्यात आला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आता समोर आली आहे. सीबीआयच्या टीमने आरोपींची जवळपास 8 तास चौकशी केली आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चार आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती दिली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या हाती संबंधित आरोपीची एक मार्कशीट देखील लागली आहे. या मार्कशीटनुसार, आरोपीची जन्मतारीख दोन डिसेंबर 2002 असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कुटुंबीयांकडून ही मार्कशीट सीबीआयच्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाचा वेग वाढला आहे. सीबीआयच्या वेगवेगळ्या टीम्सनं अनेक लोकांकडे घटनेबद्दल चौकशी करत आहेत. 

Web Title: 7-year-old boy rapes 6-year-old girl; Uttar Pradesh shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.