खार येथून पिस्तुलासह ७ काडतुसांसह आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 20:05 IST2019-04-26T20:05:05+5:302019-04-26T20:05:31+5:30
बेकायदेशीररित्या पिस्तुलाची विक्री करण्यास आलेल्या एका इसमाला पोलिसंनी अटक केली आहे.

खार येथून पिस्तुलासह ७ काडतुसांसह आरोपीस अटक
मुंबई - गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून खार पश्चिमेकडील शर्ली राजन रोडवरील पेटिट शाळेच्या मैदानाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या पिस्तुलाची विक्री करण्यास आलेल्या एका इसमाला पोलिसंनीअटक केली आहे.
पोलिसांनी सापळा रचून या आरोपीस एका देशी बनावटीच्या पिस्तुलीसह ७ जिवंत काडतुसांसह शिताफीने ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतलेल्या इसमाने आपण हे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. लोकसभा निवडणुकीमुळे शहरात भरारी पथकाच्या मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु असून पोलिसांच्या देखील कारवाया वाढल्या आहेत.
मुंबई - खार येथून पिस्तुलासह ७ काडतुसांसह आरोपीस अटकhttps://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) April 26, 2019