शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:32 IST

पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केले आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. हापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव सुमन म्हणाले की, या प्रकरणी आमची सहा पोलिसांची पथके तपास करत आहेत. 

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात सहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. घटनेला चार दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी मोकाट आहे. दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केले आहेत.दिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गर्ह मुक्षतेश्वर गावातून मुलीच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं. एका दुचाकीस्वाराने तिला उचलून नेलं होतं. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.वैद्यकीय तपासणीत बलात्काराची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुलीला तातडीने मेरठच्या एका खास रुग्णालयात आणले गेले आणि तिच्यावर एका शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिची प्रकृतीत स्थिर आहे, पण धोक्यापासून मुक्त नाही. “तिला दीर्घ कालावधीसाठी उपचारांची आवश्यकता असेल, आम्हाला आणखी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असू शकते,” असे मेरठ मेडिकल कॉलेज व रुग्णालयात प्रिन्सिपल एस. के. गर्ग यांनी सांगितले.

 

मुलीची प्रकृती स्थिर असली तरी तिचा जबाब घेणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, तिने आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच तयार करण्यात आले असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केला आहे. हापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव सुमन म्हणाले की, या प्रकरणी आमची सहा पोलिसांची पथके तपास करत आहेत. 

 

 

मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशPOCSO Actपॉक्सो कायदा