शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी ६ जणांना अटक, ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:39 IST

Umesh Kolhe Murder Case : थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे. 

अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा तपास एनआयएची टीम करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (२२),  अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (२४), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२), अतिब रशीद वल्द आदील रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे. अटक केलेले सहा आरोपी अमरावती येथील आहेत. ‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला. त्यानंतर, आता महाराष्ट्र सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अमरावतीतील कोल्हे खून प्रकरणाचा तपास NIA कडे सोपविण्यात आल्याचे सांगितले. या हत्याप्रकरणाचे कट-कारस्थान, हत्येच्या मागे असेलेल्या संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या ट्विट अकाऊंटवरुन सांगितले आहे.  

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने हत्या 

व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने झाली असल्याचा आरोप उमेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा तीन जणांनी एका व्यक्तीचा गळा चिरून खून केला. मृत तरुणाच्या 8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपीने वडिलांची निर्घृण हत्या केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीArrestअटकPoliceपोलिसAmit Shahअमित शाहNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा