"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:16 IST2025-07-19T14:47:32+5:302025-07-19T16:16:18+5:30
राजस्थानातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना वासनेचा बळी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर
Rajasthan Teacher Harassment Case:राजस्थानत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. राजस्थानमधील चित्तोडगढ जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेतील ५९ वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शिक्षक शंभूलाल धाकड नावाच्या या नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. २३ विद्यार्थिनींनी या शिक्षकावर छळाचा आरोप केला आहे. आरोपी शिक्षकाला निलंबित करत अटक करण्यात आली. आरोपी शिक्षकाचा एक लज्जास्पद व्हिडिओही समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी हा माणूस नसून राक्षस असल्याचेही म्हटले.
राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यात शिक्षिकेने केलेल्या लज्जास्पद कृत्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभूलाल धाकड याने विद्यार्थी आणि विद्यार्थीनी दोघांनाही त्रास दिला. आरोपी शंभू लाल धाकडविरुद्ध पोस्को कायदा, एससी/एसटी कायदा, भारतीय न्याय संहिता, आयटी कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कठोरता कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
शंभूलालच्या वासनेला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांचे वय ८ ते १६ वर्षे आहे. शंभूलाल धाकड दोन वर्षांपासून त्यांचे शोषण करत होता. जर तुम्ही पालकांना काही सांगितले तर परीक्षेत नापास करेल, असं तो विद्यार्थ्यांना धमकवायचा. नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांनी निमूटपणे त्याचा अत्याचार सहन केला. या शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी रोष व्यक्त केला. "हा शिक्षक नाही तर एक राक्षस आहे. शिक्षकाने पदाचा गैरवापर करून निष्पाप शाळकरी मुलांचा लैंगिक छळ केला आहे. सरकार आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करेल," असं मदन दिलावर यांनी म्हटलं.
कसा झाला खुलासा?
एका पीडित विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना मला शाळेत पाठवून नका असं सांगितले होते. माझी शाळासुद्धा बदला असंही तो म्हणत होता. त्यानंतर पालकांनी मुलाला विश्वासात घेतलं आणि घडलेला प्रकार जाणून घेतला. ते सगळं ऐकल्यानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला. कुटुंबियांना शंभूलालच्या कृत्याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकरी शाळेत पोहोचले आणि त्यांना शाळेला टाळं लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी शाळेत पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवळं आणि पुढील कारवाई सुरु केली.