शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

धक्कादायक! कोलकात्यातील भाजपा कार्यालयाजवळ आढळले तब्बल 51 देशी बॉम्ब; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 8:20 AM

51 Bombs Found Near BJP Office In Kolkata : कोलकातामधून तब्बल 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोना व्हायरससारख्या महभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधून (Kolkata) तब्बल 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोलकातामधील एका चौकाजवळ बॅगमध्ये 51 देशी बॉम्ब सापडले. याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. धक्कादायक बाब म्हणजे जिथे बॉम्ब आढळले ती जागा भाजपा कार्यालयाच्या जवळच (Crude Bombs Near BJP Office) आहे. 

भाजपा कार्यालयाजवळ सापडलेले हे सर्व बॉम्ब देशी बॉम्ब असून कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व बॉम्ब निष्क्रीय केले गेले आहेत. कोलकाता पोलिसांच्या अँटी राऊडी सेक्शनने हे बॉम्ब जप्त केले आहेत. याआधीही पश्चिम बंगालमध्ये अनेकदा बॉम्ब आढळून आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भाजपा कार्यालयाजवळ इतक्या मोठ्या संख्येने बॉम्ब सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी देखील मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडले होते. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास 200 गावठी बॉम्ब जप्त केले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तर त्या आधीही दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला होता आणि पाच कार्यकर्ते हे जखमी झाले होते. त्यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप देखील केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBombsस्फोटकेBJPभाजपाIndiaभारत