शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 18:53 IST

Murder : शेख युनूस शेख हसन  व जगदीश भुरेवाल हे दोघे शहरातील अभय कोटेक्स येथे हमालीचे काम करतात.

ठळक मुद्देया वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने जगदीश भुरेवाल याने शेख हसन यांच्या छातीत लात मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जालना : एका ५० वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना जालना शहरातील कालीकृर्ती परिसरात शनिवारी रात्री घडली. शेख युनूस शेख हसन (५० रा. कुंभेफळ जालना) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी संशयीत आरोपी जगदीश तुळशीराम भुरेवाल (५२ रा. कालीकृर्ती जालना) याला ताब्यात घेतले आहे.

शेख युनूस शेख हसन  व जगदीश भुरेवाल हे दोघे शहरातील अभय कोटेक्स येथे हमालीचे काम करतात. शनिवारी रात्री जगदीश भुरेवाल याची बायको माहेरी गेल्याने जगदीश भुरेवाल व शेख युनूस शेख हसन हे दोघे दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने जगदीश भुरेवाल याने शेख हसन यांच्या छातीत लात मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी जगदीश भुरेवाल हा टेंशनमध्ये घराबाहेर फिरत होता. त्याला काही लोकांनी काय झाल्याचे विचारले असता, त्याने सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोनि. संजय देशमुख, समाधान तेलंग्रे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शेवच्छिदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी जगदीश तुळशीराम भुरेवाल (५२ रा. कालीकृर्ती) यास ताब्यात घेतले असून, विचारपूस केली जात आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मयताचे  बहीण मो गोरेजानी हसन शेख (५८) यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोउपनि. भताने हे करीत आहेत.वर्षभरात ३७ खूनजालना जिल्ह्यात वर्षभरात ३७ खून झाले आहे. त्यापैकी ३६ खूनाची प्रकरणे उघडकीस आले आहेत. तर तब्बल ९३ जणांनी खूनाचा प्रयत्न केला आहे.  गतवर्षात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच रविवारी दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MurderखूनJalanaजालनाPoliceपोलिस