शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 12:45 PM

50 people arrested in pakistan temple demolition case 150 people booked : मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आलं आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या गणेश मंदिरात बुधवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.

लाहोरपासून 590 किमीवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे मुख्य आरोपीसह 50 जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड झाल्याची घटना लाजिरवाणी असल्याची भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात काही लोकं मंदिराच्या आत लाठी-काठ्या घेऊन शिरले होते. त्यानंतर मंदिरात तोडफोड सुरू केली.

पंतप्रधान कार्यालयाने घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला.  तसेच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक डॉ. शहबाज गिल यांनी ट्वीट करत ही घटना अतिशय दु:खद आणि खेदजनक असल्याचं म्हटलं. पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पाकिस्तानचं संविधान अल्पसंख्यांकांना त्यांची पूजा स्वतंत्ररित्या करण्याचं स्वातंत्र्य आणि सुरक्षा देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

या प्रकरणी इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफ या ठिकाणी झालेल्या मंदिराच्या तोडफोडीचं कृत्य हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दिली. दोषींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांकडेही दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTempleमंदिरHinduहिंदूPoliceपोलिसArrestअटक