शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नवीन सिमकार्डद्वारे व्यावसायिकाची ५० लाखांची फसवणुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 9:04 PM

२८ बँक खात्यात केले पैसे ट्रान्सफर

ठळक मुद्देखडक पोलिसांनी फसवणूकीचा केला गुन्हा दाखल

पुणे : फायनान्सचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाच्या नावाने खोटी ओळख सांगून नवी सिमकार्ड घेऊन सायबर चोरट्याने ५० लाख रुपये वेगवेगळ्या २८ बँक खात्यात ट्रान्सफर करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी लोणीकाळभोर येथील ३९ वर्षाच्या व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या व्यावसायिकाचे सदाशिव पेठेत कार्यालय आहे़. ते २६ नोव्हेंबरला मुंबईला गेले होते़. त्यावेळी मुंबईत सायंकाळी ७ वाजता त्यांचा फोन अचानक बंद पडला़. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्क करता येईना़. मुंबईतून आल्यानंतर त्यांनी आयडिया कंपनीच्या गॅलरीत जाऊन आपला फोन बंद पडल्याचे सांगितल्यावर त्यांना तुमच्या नावावर तर नवीन सीम कार्ड दिले असून ते २६ नोव्हेंबरपासून सुरु आहे़. त्यानंतर ते कार्यालयात आले व त्यांनी कार्यालयातील संगणकावर पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ५० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले़ त्यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला़. या व्यावसायिकाच्या नावाची खोटी ओळख धारण करुन बनावट कागदपत्राच्या आधारे चोरट्याने आयडियाचे नवीन सिमकार्ड मिळविले़ ते कंपनीने अ‍ॅक्टिव्हेट केल्यावर या व्यावसायिकाकडील जुने सिमकार्ड बंद पडले़. त्यांच्या सीम कार्डवर बँक खाते लिंक असल्याने चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या २८ बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली आहे़. सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही बाब पुढे आले आहे़. खडक पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस