बंदुकीचा धाक दाखवून ५ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; ३ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 18:15 IST2021-06-20T18:14:05+5:302021-06-20T18:15:31+5:30
Gangrape Case : या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एएसपी, सीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला.

बंदुकीचा धाक दाखवून ५ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; ३ आरोपींना अटक
उत्तर प्रदेशातील हरदोई येथे अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाचही जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एएसपी, सीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला.
सामूहिक बलात्काराच्या घटनेत सामील झालेल्या पाच आरोपींपैकी तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या सांडी परिसरातील खेड्यातील आहे. पीडित मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, १५ जून रोजी घरातील सर्व लोक एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी घरी बहीण एकटी होती. वडील रोडवेज बस चालक असल्याने ते बाहेर गावी होते. या घटनेच्या वेळी त्याची बहीण घरी एकटीच झोपली होती.
त्यानंतर गावातील पाच मुले जबरदस्तीने घरात घुसली आणि बंदुकीचा धाक दाखवून बहिणीला घेऊन गेले. यानंतर तिला शेतात नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घरातील सर्वजण लग्नाच्या कार्यक्रमातून परत आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती सांगितली.
बाईकवरून जाणाऱ्या तरुणाची मान अडकली मांज्यात; जागीच झाला मृत्यू https://t.co/6D3Ihx9rb4
— Lokmat (@MiLOKMAT) June 20, 2021
पुढे पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितले की, संबंधित तरुणांनी हे कृत्य केल्यानंतर मुलीला याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्यासह कुटुंबातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे मुलगी घाबरून गेली होती. पोलिसांकडे तक्रार केल्यास सर्वांना गोळ्या घालण्याची धमकी दिली जात असल्याचे त्याने सांगितले. याबाबत पोलीस अधीक्षक अनिल कुमार यादव यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा तपास सुरू करण्यात आला आहे.