नाशिकच्या नोटा छपाई प्रेसमधून 5 लाख गायब?, पोलीस तपासात उलगडलं वेगळंच सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:49 PM2021-07-27T23:49:03+5:302021-07-27T23:56:04+5:30

दोन सुपरवायझर निलंबीत : चोरी नसून निष्काळजीपणा उघड

5 lakh missing from Nashik note printing center, a different secret revealed by police investigation | नाशिकच्या नोटा छपाई प्रेसमधून 5 लाख गायब?, पोलीस तपासात उलगडलं वेगळंच सत्य

नाशिकच्या नोटा छपाई प्रेसमधून 5 लाख गायब?, पोलीस तपासात उलगडलं वेगळंच सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देचलार्थपत्र मुद्रणालयमध्ये गेल्या 9 फेब्रुवारी रोजी पाचशे रुपये नोटांच्या दराचे दहा बंडल हरवल्याचे दोन-तीन दिवसांनी निदर्शनास आले होते. त्यानंतर मुद्रणालय व्यवस्थापनाकडून हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या नोटांची चौकशी करण्यात येत होती

नाशिक रोड : भारत सरकारच्या जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातून (करन्सी नोट प्रेस) सहा महिन्यापूर्वी पाच लाखांच्या नोटांचे बंडल चोरीस केलेल्या प्रकरणाचा तपास उपनगर पोलिसांनी कौशल्याने केला आहे. या घटनेत पाच लाखांचे बंडल चोरीस गेले नव्हते. कामाच्या लोडमध्ये कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून पंचिग झाल्याचे पोलिसांना सांगितले असून प्रेस व्यवस्थापनाला लेखी कबूली जबाब दिला आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकाव्दारे सांगितले.

चलार्थपत्र मुद्रणालयमध्ये गेल्या 9 फेब्रुवारी रोजी पाचशे रुपये नोटांच्या दराचे दहा बंडल हरवल्याचे दोन-तीन दिवसांनी निदर्शनास आले होते. त्यानंतर मुद्रणालय व्यवस्थापनाकडून हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या नोटांची चौकशी करण्यात येत होती. एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाउन लागल्याने मुद्रणालयातील काही सेक्शन बंद पडल्याने समितीकडून तपास थांबला होता. परंतु जून महिन्यापासून पुन्हा घायाळ झालेल्या नोटांचा तपास सुरु करण्यात आला होता. चलार्थ पत्र मुद्रणालयातील पाच लाखाच्या चोरीस गेलेल्या नोटांबाबत उपनगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिस आयुक्त दिपक पाण्ड्ये, उपायुक्त विजय खरात, सहआयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके आदींनी मुद्रणालयामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पद्धत समजून घेत सर्व माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी सुरु करूनही काहीच माहिती सुरवातीस हाती लागत नव्हती. 

पाचशे रुपयाच्या दहा बंडलचे पाकीट शेवटी कोणाच्या निदर्शनास आले याची माहिती घेतली. प्रेसमधील कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यावरून चोरीस गेलेला बंडल 12 फेब्रुवारीला तपासणीकडून तपासला गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्चितता होत नसल्याने बंडलचा फुल पार्सल फोडून तपासणी केली असता सदर ठिकाणी दुसराच बंडल चेक केल्याचे दिसून आले. या ठिकाणी सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते. सर्व कामगारांची संपूर्ण झडती जाताना व येताना घेतली जाते. पोलिसांनी कामगारांना विश्वासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी सुपरवायझरवर लक्ष करून त्यांचे रेकॉर्ड तपासले. त्यात कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खरी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. पोलिस कारवाईच्या भितीने 24 जुलैला त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब देत त्यांनी हा नोटांचा बंडल चोरीस गेलेला नसून कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला व व्यवस्थापन कारवाई करेल या भितीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे लेखी सांगितले. 

या कबूली जबाबाची खात्री केल्यावर वर्कमॅनच्या तपासात दुजोरा मिळाला. पोलिसांनी कटपॅक सेक्शनमधील स्ट्रांग रूम तसेच रेकार्ड रजिस्टर, स्टार नोटांचे रजिस्टर यांची बारकाईने तपासणी केली. त्यामुळे धागेदोरे सापडत गेले. सुपरवायझरच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना याची माहिती होती काय याचा तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सुपरवायझर रेड्डी व आणखी एका जणाला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलीस तपासामध्ये 5 लाख रुपयांची रोकड चोरीस गेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने कामगारांवर व्यक्त होत असलेला विश्वास हा द्विगुणीत झाला आहे.
 

Web Title: 5 lakh missing from Nashik note printing center, a different secret revealed by police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.