पुण्यातील सहकारनगरमध्ये टोळक्याकडून ४१ वाहनांची तोडफोड; पिंपरीतही कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 10:53 IST2020-02-02T10:52:46+5:302020-02-02T10:53:49+5:30

सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत एका टोळक्याने पहाटे हैदास घातला असून पार्क केलेल्या तब्बल ४१ वाहनांची तोडफोड केली आहे.

41 vehicles vandalized in Sahakarnagar, Pune; Pimpri also | पुण्यातील सहकारनगरमध्ये टोळक्याकडून ४१ वाहनांची तोडफोड; पिंपरीतही कृत्य

पुण्यातील सहकारनगरमध्ये टोळक्याकडून ४१ वाहनांची तोडफोड; पिंपरीतही कृत्य

पुणे : सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत एका टोळक्याने पहाटे हैदास घातला असून पार्क केलेल्या तब्बल ४१ वाहनांची तोडफोड केली आहे. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ या टोळक्यांचा हैदोस सुरु होता. ही घटना तळजाई वसाहतीतील गणपती मंदिराजवळील गल्ली नंतर २४ मध्ये घडली आहे. टोळक्यांच्या दहशतीमुळे नागरिक भितीपोटी घरातून बाहेर आले नाहीत. सुमारे अर्धा ते पाऊण तास टोळक्यांचा हा धुडगुस सुरु असतानाही पोलिसांना याचा पत्ता नव्हता. हे टोळके निघून गेल्यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहचले.


३ रिक्षा, कार आणि ३० ते ३५ दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हे टोळके कोण होते, त्यांनी कशासाठी ही तोडफोड केली याची काहीही माहिती अजून सहकारनगर पोलिसांना होऊ शकली नाही. टोळक्याने लाकडी दांडके, कोयते यांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडल्या. 


पुण्याबरोबरच पिंपरीतील थरमॅक्स चौक, अजंठानगर येथेही १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटनाही मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

Web Title: 41 vehicles vandalized in Sahakarnagar, Pune; Pimpri also