४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:04 IST2021-07-11T20:03:27+5:302021-07-11T20:04:13+5:30

Gangrape : तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

40-year-old woman gang-raped; Two arrested | ४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

लाखनी (भंडारा) : तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) शेतिशवारात एका ४० वर्षिय महिलेवर दोघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना ८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी तक्रार देण्यात आली. विशेष म्हणजे अत्याचार करण्याचा व्हिडीओही तयार करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान महिलेच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी दोन जणांना रविवारी अटक केली.

बाळू चचाने (३२) व हरी उर्फ सेवक शेंडे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. माहितीनुसार पीडित महिला तालुक्यातील एका कंपनीत कार्यरत आहे. चचाणे व शेंडे या दोघांनी संधी साधुन या महिलेला रेंगेपार (कोहळी) येथील शेतशिवारात नेऊन सामूहिक अत्याचार केला व कुठे वाच्यता करु नये म्हणून व्हिडीओही तयार केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने १० जुलै रोजी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 40-year-old woman gang-raped; Two arrested