१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:02 IST2021-11-28T18:01:18+5:302021-11-28T18:02:36+5:30
Crime News : आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली.

१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू
नोएडाच्या सेक्टर ७५ मधील एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या बाल्कनीत खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा शनिवारी पडून मृत्यू झाला.
दसनॅक सोसायटीच्या टॉवर बीमधील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीत मुलगा आईसोबत खेळत असताना ही घटना घडली. आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली.
पोलिसांच्या तपासानुसार, प्रथमदर्शनी मूल बाल्कनीच्या रेलिंगवरून घसरले आणि जमिनीवर कोसळले. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील शेजाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना मुलगा पडला तेव्हा आवाज ऐकला आणि तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला तातडीने निओ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना निओ हॉस्पिटलने या घटनेची माहिती दिली. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मुलाचे वडील जुन्या दिल्लीच्या चांदनी चौकात दुकान चालवतात तर आई गृहिणी आहे. सहा महिन्यांपूर्वीच हे कुटुंब अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते.