शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगत महिलेला ४ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:04 PM

प्रत्यक्षात या महिलेने कोणतीही कधी लॉटरी काढली नव्हती. मात्र,२५ लाख रुपये मिळणार हे समजल्यावर या महिलेने म्हणतील, त्यानुसार बँकेत पैसे भरायला सुरुवात केली.

ठळक मुद्देपोलिसांनी ५ मोबाईलधारक व स्टेट बँक खातेधारकावर केला गुन्हा दाखल

पुणे : आपल्याकडे असलेल्या पैशांतून अधिक पैसे मिळविण्याची इच्छा सर्वांनाच असते़ मात्र, कोणतीही लॉटरी न काढताही २५ लाखांची लॉटरी लागल्याच्या आलेल्या फोनने हुरळून जाऊन एका महिलेला तब्बल ४ लाख १५ हजार रुपये गमवावे लागले. ज्योतिष सांगणार्‍या या महिलेला आपल्या भविष्यात काय आहे, हे मात्र समजू शकले नाही.याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी ५ मोबाईलधारक व स्टेट बँक खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ एप्रिल ते १२ मे दरम्यान घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फिर्यादी महिला डहाणुकर कॉलनीत रहायला आहेत. त्यांना शर्मा असे नाव सांगणार्‍या एकाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना आपण मुंबईतील एसबीआयचा मॉकेटिंग हेड असल्याचे सांगितले. तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ मधून २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी तुम्हाला अगोदर टॅक्स भरावा लागेल व इतर बाबींची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले. प्रत्यक्षात या महिलेने कोणतीही कधी लॉटरी काढली नव्हती. २५ लाख रुपये मिळणार हे समजल्यावर या महिलेने ते म्हणतील, त्यानुसार बँकेत पैसे भरायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांच्याशी सायबर चोरटे संपर्क साधून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरायला भाग पाडत होते. ४ लाख १५ हजार रुपये भरल्यानंतरही आपल्याला लॉटरीचे पैसे मिळत नसल्याचे समजल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस