शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 2:53 PM

1 / 7
New Maruti Swift Launched: भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने आज आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती Swift चे नवीन मॉडेल लॉन्च केले. कंपनीने कारची अधिकृत बुकिंग सुरू केली असून, इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे कार बुक करू शकतात.
2 / 7
किंमत किती? आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या मारुती स्विफ्टच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. या हॅचबॅक कारमध्ये कंपनी अनेक मोठे बदल करत आहे.
3 / 7
डिझाइन:- कारचे ओव्हरऑल डिझाइन आधीसारखेच आहे, पण आता ती पूर्वीपेक्षा अधिक शार्प झाली आहे. कंपनीने यात नवीन बंपर आणि नवीन डिझाइन केलेले रेडिएटर ग्रिल दिले आहेत. याशिवाय, ब्रँडचा लोगो जो आधी ग्रिलवर असायचा, तो आता कारच्या बोनेटवर लावण्यात आला आहे. नवीन हेडलॅम्प आणि फॉग-लॅम्प कारला पूर्णपणे फ्रेश लुक देतात.
4 / 7
कारचा आका:- नवीन स्विफ्ट आकाराने थोडी मोठी आहे. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा 15 मिमी लांब आणि अंदाजे 30 मिमी रुंद असेल. पण, व्हीलबेस पूर्वीप्रमाणे 2,450 मिमी आहे. कंपनीने नवीन स्विफ्टमध्ये मादील दरवाजावरील सी-पिलर हँडल काढून पारंपरिक दिले आहे. याशिवाय नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स कारला अधिक सुंदर बनवतात.
5 / 7
कारचा आतील भाग:- कारच्या इंटिरिअरला स्मार्ट लुक देण्यात आला आहे. याचे केबिन फ्रॉन्क्ससारखेच आहे. यात फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टाइल सेंटर एअर-कॉन व्हेंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय, तुम्हाला कारमध्ये नवीन अपहोल्स्ट्री आणि नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड देखील मिळेल. केबिनमधील काही घटक Brezza आणि Baleno मधून घेतले आहेत.
6 / 7
नवीन इंजिन अन् चांगले मायलेज:- मारुती स्विफ्टमध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या पॉवरट्रेनमध्ये दिसून येतो. यात कंपनीने नवीन 1.2 लिटर क्षमतेचे 'झेड' सीरीज इंजिन दिले आहे. हे 82hp पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करते. सध्याच्या मॉडेलमध्ये 'के' सीरिजचे इंजिन मिळते. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट 25.72 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 3 किमी/लिटर जास्त आहे.
7 / 7
इतर फिचर्स:- नवीन मारुती स्विफ्टमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील बाजूस एसी व्हेंट्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारखी फिचर्स दिली आहेत. ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग मिळतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलदेखील मिळतो.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग