Join us  

Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 3:01 PM

Go Digit IPO : इन्शुरन्स क्षेत्रातील ही कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. गुंतवणूकदारांना १५ ते १७ मे दरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

Go Digit IPO : कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाचं समर्थन असलेली गो डिजिट जनरल इन्शुरन्स (Go Digit General Insurance) ही कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. या कंपनीच्या आयपीओ डॉक्युमेंटनुसार गुंतवणूकदारांना १५ ते १७ मे दरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तर अँकर गुंतवणूकदारांना १४ मे रोजी गुंतवणूक करता येणार आहे.  

आयपीओची इश्यू प्राइस अद्याप जाहीर झालेली नसली तरी यात ग्रे मार्केटमध्ये मात्र तुफान तेजी आहे. आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम ५० रुपये आहे. मार्चमध्ये आयपीओ आणण्यासाठी कंपनीला सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली होती. 

आयपीओचे डिटेल्स 

गो डिजिटच्या प्रस्तावित आयपीओमध्ये १,१२५ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रवर्तक गो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस आणि विद्यमान भागधारकांकडून ५.४७ कोटी इक्विटी समभागांच्या ऑफर फॉर सेलचा (OFS) चा समावेश आहे. गो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेसचा सध्या कंपनीत ८३.३ टक्के हिस्सा आहे. मॉर्गन स्टॅनली, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक, आयआयएफएल सिक्युरिटीज, नुवामा इश्यू या कंपन्यांचे लीड मॅनेजर्स आहेत. तर लिंक इनटाइम इंडिया हे रजिस्ट्रार आहेत. 

विराट कोहलीचीही गुंतवणूक 

या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही समावेश आहे. आयपीओमध्ये ते आपले शेअर्स विकणार नाहीत. एफएएल कॉर्पोरेशनची मालकी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जकडे आहे, ज्याची गो डिजिटची ४५.३% भागीदारी आहे. कंपनीत कामेश गोयल आणि ओबेन व्हेंचर्स एलएलपी यांचा अनुक्रमे १४.९६ टक्के आणि ३९.७९ टक्के हिस्सा आहे. 

कसे होते तिमाही निकाल? 

गो डिजिट इन्शुरन्सचा निव्वळ तोटा आर्थिक वर्ष २०२१ मधील १२२ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये वाढून २९५ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न ३,८४१ कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष २०२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये प्रीमियम उत्पन्न ६२ टक्क्यांनी वाढले आहे.

टॅग्स :विराट कोहलीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार