वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:56 IST2022-02-20T16:56:02+5:302022-02-20T16:56:55+5:30
Gangrape Case :आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे.

वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक
बंगळुरू : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कामसमुद्र पोलीस स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या वाढदिवशी सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी मुलगी तिच्या वाढदिवसानिमित्त नवीन कपडे आणि चॉकलेट्स खरेदी न केल्याने तिच्या पालकांवर रागावली होती. त्यामुळे ती शुक्रवारी शाळेत न जाता बंगरापेटला जाण्यासाठी बसमध्ये चढली. तिला एकटे पाहून बदमाशांनी तिच्याशी बोलून एका उद्यानात नेले आणि सायंकाळपर्यंत तेथेच ठेवले.
'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या
सायंकाळी उशिरा आरोपीने तिला खासगी बसने तनिमदगू या गावी नेले. वाटेत एका निर्जनस्थळी आरोपींनी दारू पिऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून गावकऱ्यांनी कळसमुद्रा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.