३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:58 IST2025-06-02T21:57:37+5:302025-06-02T21:58:09+5:30

शनिवारी सीबीआयने या प्रकरणी २५ लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले

3.5 kg gold, 2 kg silver and 1 crore cash...: recoveries at IRS officer Amit Kumar Singhal house | ३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

केंद्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ३१ मे रोजी २००७ च्या बॅचमधील ज्येष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक यांना लाच घेतल्याच्या आरोपात अटक केले होते. तक्रारीनुसार, आयआरएस अधिकारी सिंगल यांनी ४५ लाखांची लाच मागितली होती. त्याबदल्यात इन्कम टॅक्स विभागातून संबंधिताला दिलासा देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र लाचेची रक्कम न दिल्यास कायदेशीर कारवाई करू, दंड आकारू अशी धमकी अधिकाऱ्यांनी दिली होती.

शनिवारी सीबीआयने या प्रकरणी २५ लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. ही रक्कम ४५ लाखांच्या रक्कमेची पहिली खेप होती. सीबीआयने आयआरएस अधिकारी सिंगल यांना दिल्लीतील वसंत कुंज इथल्या निवासस्थानातून अटक केली. सीबीआय या घटनेबाबत पुढील तपास करत आहे. त्यात दिल्ली, पंजाब आणि मुंबईतील अनेक ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या. 

या छापेमारीत सीबीआयला ३.५ किलो सोने, २ किलो चांदी, १ कोटी रोकड आणि २५ बँक अकाऊंटचे कागदपत्रे जप्त केली. दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील मालमत्तेची कागदपत्रेही आढळली आहे. सध्या सीबीआय या सर्व संपत्तीची मोजणी आणि त्याचा सोर्स याचा तपास घेत आहे. रविवारी या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक केलेले आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल सध्या दिल्लीतील आयटीओ येथील सीआर बिल्डिंगमध्ये करदाता सेवा संचालनालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते. 
 

Web Title: 3.5 kg gold, 2 kg silver and 1 crore cash...: recoveries at IRS officer Amit Kumar Singhal house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.