भुसावळात दीड लाख रुपये किंमतीचा ३३ किलो गांजा जप्त, धुळ्याच्या दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:43 IST2021-12-30T17:30:46+5:302021-12-30T17:43:38+5:30
Drug Case : बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पथक रेल्वे स्टेशन परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. त्यावेळी तिथे एका कारची (क्र. एम.एच.-०१-बी.टी.-६६८) तपासणी करण्यात आली.

भुसावळात दीड लाख रुपये किंमतीचा ३३ किलो गांजा जप्त, धुळ्याच्या दोन जणांना अटक
भुसावळ जि. जळगाव : रेल्वेतून आणलेला ३३ किलो गांजा बाजारपेठ पोलिसांनी पकडला आहे. यात धुळ्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली. वाहनचालक विजय वसंत धिवरे (४५) आणि नंदकिशोर हिरामण गवळी (२८, दोन्ही रा.धुळे) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पथक रेल्वे स्टेशन परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. त्यावेळी तिथे एका कारची (क्र. एम.एच.-०१-बी.टी.-६६८) तपासणी करण्यात आली. वाहनाची डिक्कीतील प्लॅस्टीक बॅगमध्ये गांजा आढळून आला. यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडून ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत एक लाख ६५ हजार रुपये इतकी आहे.