बनावट कर्जप्रकरण करून ३० लाखांची फायनान्स कंपनीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:15 IST2019-08-01T17:14:36+5:302019-08-01T17:15:59+5:30
बजाज फायनान्स कंपनीस जुनी कागदपत्रे सादर केली़ तसेच दुकानात ग्राहक येत नसताना सुद्धा कंपनीच्या सेल्स प्रतिनिधीच्या मदतीने विविध वस्तू विकत घेतल्याची कागदपत्रे सादर केली़..

बनावट कर्जप्रकरण करून ३० लाखांची फायनान्स कंपनीची फसवणूक
पुणे : दुकानात ग्राहक नसतानाही जुन्या कागदपत्रांचा वापर करुन बजाज फायनान्स कंपनीचा, ग्राहकांचा व इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचे वितरकांची फसवणूक करुन ३० लाख २२ हजार ३६३ रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. तनुजा प्रमोद ऊर्फ परशुराम हाक्के, प्रमोद ऊर्फ परशुराम हाक्के (रा़. धनकवडी) व सागर राम कांबळे (रा़. संभाजीनगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी हेमंत वसंतराव अहिरराव (वय ४०, रा़ साईसिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार धनकवडीतील साईनाथ इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात २०१८ ते जून २०१९ दरम्यान घडला आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तनुजा हाक्के आणि परुशुराम हाक्के यांनी हेमंत अहिरराव यांच्या बजाज फायनान्स कंपनीस जुनी कागदपत्रे सादर केली़ तसेच दुकानात ग्राहक येत नसताना सुद्धा कंपनीच्या सेल्स प्रतिनिधीच्या मदतीने विविध वस्तू विकत घेतल्याची कागदपत्रे सादर केली़. त्यानुसार बजाज फायनान्स कंपनीने ही कर्ज प्रकरणे मंजूर केली़ प्रत्यक्षात दुकानदाराने वस्तूंची विक्री केलीच नाही़. बनावट कर्ज प्रकरणे करुन फायनान्स कंपनी, ग्राहकांचा व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे वितरक अनिल म्हस्के व इतर इलेक्ट्रीक वस्तूचे वितरक यांचा विश्वास संपादन करुन एक ३० लाख २२ हजार ६३३ रुपयांची फसवणू केली आहे़. सहकारनगर अधिक तपास करीत आहेत़.