शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२५ हजार जणांचे बनवले सव्वा दोन कोटी फॉलोअर्स; सिव्हिल इंजिनीयरला सीआययूकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:10 IST

एवीएमएसएमएम’ नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता.

- मनीषा म्हात्रे मुंबई : बनावट फॅन्स फॉलोअर्स प्रकरणात मुंबईच्या सिव्हिल इंजिनीयर तरुणाने तब्बल २५ हजार जणांचे सव्वा दोन कोटी फॉलोअर्स बनविल्याची धक्कादायक माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या (सीआययू) कारवाईतून उघड झाली आहे. कशिफ मन्सूर (३०) असे तरुणाचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यात, मुंबईसह राज्यभरातील स्ट्रगलर, पडद्यामागील कलाकार, मालिका, नाटक, चित्रपटांत छोट्या भूमिका साकारणाऱ्यांचाही समावेश आहे.

मन्सूर हा मुंबईचा रहिवासी आहे. त्याने ‘एवीएमएसएमएम’ नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता. सीआययूचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर, तपासादरम्यान मन्सूर पथकाच्या हाती लागला. त्याच्या चौकशीत त्याने आतापर्यंत २५ हजार जणांना २ कोटी ३० लाख बनावट फॉलोअर्सची विक्री केल्याचे समोर आले. यात, सुरुवातीला बनावट अकाउंटद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना टार्गेट केले. रेटकार्ड दाखवून तो फॉलोअर्सची विक्री करत होता. कलाकार मंडळी त्याच्या जाळ्यात अडकली आणि प्रसिद्धीसाठी त्यांनी बनावट फॉलोअर्सचा आधार घेतला. यात, मन्सूरने कोट्यवधी रुपये कमावले असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

त्या दोन अभिनेत्रींचीही होऊ शकते चौकशी

इन्स्टिट्यूट आॅफ कंटेंपररी म्युझिकने गेल्या वर्षी बनावट फॅन्स फॉलोअर्सप्रकरणी प्रसिद्ध केलेल्या अहवालात बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये भूमिका साकारणाºया दोन बड्या अभिनेत्रींचे ४५ टक्क्यांहून अधिक बनावट चाहते असल्याचा दावा केला होता. हा अहवालही सीआययूने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतो, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

दवडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

बनावट फॅन्स प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या अविनाश दवडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याने फॉलोअर्स कार्ट संकेतस्थळाच्या माध्यमांतून ९ लाख रुपये कमावले होते.

असे होते रेटकार्ड

टिष्ट्वटर फॉलोअर्स - २४२ रुपयेकमीतकमी २०, जास्तीतजास्त ५००टिष्ट्वटर कमेंट - ३ हजार १४२ रुपयेकमीतकमी १०, जास्तीतजास्त १००इंस्टाग्राम फॉलोअर्स - १८९.४५ रुपयेकमीतकमी १००, जास्तीतजास्त ५०००इंस्टाग्राम व्हिडीओ लाइक्स : ११६ रुपयेकमीतकमी १००, जास्तीतजास्त १००००इंस्टाग्राम कमेंट्स - १८९ रुपयेकमीतकमी ५०, जास्तीतजास्त ३०,०००

टॅग्स :Twitterट्विटरPoliceपोलिस