२४ महिलांवर बलात्कार, १२ जणींना केले गुलाम! ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:41 IST2023-01-18T10:40:47+5:302023-01-18T10:41:16+5:30

२००३ ते २०२० या नोकरीच्या कालावधी दरम्यान केले क्रूर कृत्य

24 women were raped, 12 were enslaved Confession of a British Police Officer | २४ महिलांवर बलात्कार, १२ जणींना केले गुलाम! ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची कबुली

२४ महिलांवर बलात्कार, १२ जणींना केले गुलाम! ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची कबुली

लंडन: ब्रिटनमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ८० हून अधिक लैंगिक गुन्हे केल्याचे कबूल केले. माजी पोलिस अधिकाऱ्याच्या या कबुलीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचे नाव डेव्हिड कॅरिक असून, त्याने २००३ ते २०२० दरम्यान नोकरीच्या दरम्यान २४ महिलांवर बलात्कार आणि १२ हून अधिक महिलांना लैंगिक गुलाम बनविल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

या प्रकरणातील भयावह बाब म्हणजे, ४८ वर्षीय डेव्हिडने अत्यंत क्रूर पद्धतीने महिलांना गुलाम बनवून त्यांचे शारीरिक शोषण केले. डेव्हिड त्यांना अन्नाशिवाय एका छोट्या कपाटात कैद करत असे. गुलाम म्हणून ठेवलेल्या महिलांना तो बेल्टने मारहाण करायचा आणि कपडे काढून घर साफ करायला लावायचा, अशी तक्रार केली आहे.

तक्रारीनंतरही...

पोलिसांकडे डेव्हिडच्या विरोधात ९ वेळा लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी आल्या, परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही. २०२१ मध्ये एका पीडित महिलेने हे प्रकरण लावून धरल्यानंतर इतर पीडित महिलांनीही तक्रारी केल्या. आता डेव्हिडने गुन्ह्यांची कबुली दिली.

 

 

Web Title: 24 women were raped, 12 were enslaved Confession of a British Police Officer