६० वर्षांच्या महिलेवर २२ वर्षीय युवकाने केला लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:27 IST2021-06-04T17:16:54+5:302021-06-04T17:27:54+5:30
Sexual Assaulted : आरोपी हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता.

६० वर्षांच्या महिलेवर २२ वर्षीय युवकाने केला लैंगिक अत्याचार
घुग्घुस(चंद्रपूर) : येथील शांतीनगर वसाहतीत राहणाऱ्या एका साठ वर्षीय महिलेवर २२ वर्षाच्या युवकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर असे आहे.
आरोपी हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. तो पंधरा दिवसांपासून शांतीनगर येथील मदरसामध्ये विद्यर्जनाचे काम करीत होता. शांतीनगर येथे पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान गेला. मदरसा येथे नमाज पडून बाहेर आला. दरम्यान, एकटी महिला शौचालयास जात असल्याची संधी साधून तिचेवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पीडित महिलेने याबाबतची तक्रार घुग्घुस पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी विरुद्ध कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहेत.