तब्बल २२ वर्षांनी फरार थापा गॅंगच्या गुंडाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:45 IST2018-08-08T19:42:35+5:302018-08-08T19:45:28+5:30

गुन्हे शाखेच्या कक्ष - ७ ने केली कारवाई; मुलुंड पोलीस ठाण्यात १ तर कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

22 year old absconding accused Thapa gang arrested | तब्बल २२ वर्षांनी फरार थापा गॅंगच्या गुंडाला बेड्या

तब्बल २२ वर्षांनी फरार थापा गॅंगच्या गुंडाला बेड्या

मुंबई - मुंबईत नव्वदीच्या दशकात भांडूपमधील थापा गँगच्या गुंडास २२ वर्षांनी गुन्हे शाखेच्या कक्ष - ७ ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना २२ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अनिल राजाराम गवंडे  गुजरातमधील वलसाड येथील उमरगावातील टिश्यू पेपर कंपनीतून अटक करण्यात आली आहे. 

मुलुंड पोलीस ठाण्यात खुनाच्या आरोपात अनिल गवंडे आणि त्याच्या ७ साथीदारांना कक्ष - ७ ने अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. नंतर १९९६ साली अनिलची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर अनिल गायब झाला सुनावणीसाठी देखील हजर राहिला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने या आरोपीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जरी केले होते. त्यांत पोलिसांनी फरार आरोपीच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे शोध घेऊन गुजरात येथून आरोपी अनिलच्या मुसक्या आवळल्या. मुलुंड पोलीस ठाण्यात १ तर कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

Web Title: 22 year old absconding accused Thapa gang arrested