२१ वर्षांच्या भाचीवर बंधक बनवून बलात्कार केला; धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:58 IST2021-05-27T13:57:55+5:302021-05-27T13:58:32+5:30

Rape Case : पोलिसांनी आरोपी काकाला (मावशीचा पती) अटक केली आहे.

21-year-old niece held hostage and raped; The shocking type was revealed | २१ वर्षांच्या भाचीवर बंधक बनवून बलात्कार केला; धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला

२१ वर्षांच्या भाचीवर बंधक बनवून बलात्कार केला; धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला

ठळक मुद्दे२१ वर्षीय पीडित मुलीने तिच्या स्वतःच्या नात्यातील माणसाने तिच्याबरोबर हे घृणास्पद कृत्य कसे केले असा सवाल उपस्थित केला.

इंदूरः मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात नात्याला लाज आणणारी घटना समोर आले आहे. जेथे काकाने (मावशीचा पती) आपल्या भाचीला ओलिस ठेवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ही बाब बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील  मरी माता  येथील असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपी काकाला (मावशीचा पती) अटक केली आहे.


२१ वर्षीय पीडित मुलीने तिच्या स्वतःच्या नात्यातील माणसाने तिच्याबरोबर हे घृणास्पद कृत्य कसे केले असा सवाल उपस्थित केला. आरोपीने तिला कुठेतरी नेऊन एका खोलीत ओलिस ठेवले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्याने प्रथम पीडित मुलीला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 


रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा तिच्या कुटूंबाने संबंधित पोलिस ठाण्यात तिला माहिती दिली. दरम्यान कसा तरी, आपला जीव वाचवल्यानंतर, ती घरी पोहोचली आणि तिने आपबिती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले आणि आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताबडतोब गुन्हा नोंदविला आणि आरोपी काकाला (मावशीचा पती) अटक केली.

Web Title: 21-year-old niece held hostage and raped; The shocking type was revealed