मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून गुरुवारी सकाळच्या सुमारास एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. येथे दोन जणांची धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथील परिस्थितीवरून हा संपूर्ण प्रकार 'नरबळी'चा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी छत्रपती सिंह याला ताब्यात घेतले आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहरा येथे घडली.
पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फूल कुमारी सिंह गोंडा (५०) आणि कमल नारायण सिंह (६५) यांना आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर त्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सुमित्रा सिंह आणि राम भजन सिंह हे दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना पहाटे ४ ते ५ च्या सुमारास घडली असून पूर्णपणे नियोजित असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. तेथे पोलिसांना तंत्र-मंत्राशी संबंधित साहित्य आढळून आले. यावरून, ही हत्या अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. यासाठी मृत व्यक्तीच जबाबदार असल्याचा संशय आरोपीला होता. या रागातून आणि अंधश्रद्धेच्या प्रभावातून त्याने हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा गावात आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीनंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Web Summary : In Singrauli, Madhya Pradesh, a man murdered two people, suspecting them of causing his wife's miscarriage. Police suspect a ritualistic killing. The accused is in custody; investigation ongoing.
Web Summary : मध्य प्रदेश के सिंगरौली में एक व्यक्ति ने दो लोगों की हत्या कर दी, उसे संदेह था कि वे उसकी पत्नी के गर्भपात का कारण थे। पुलिस को नरबलि का संदेह है। आरोपी हिरासत में; जांच जारी।