दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाखांची चाेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 15:41 IST2018-07-29T15:39:57+5:302018-07-29T15:41:18+5:30
थेरगाव येथील एका दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाख ८८ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला.

दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाखांची चाेरी
पिंपरी : दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८८ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी रात्री थेरगाव येथे घडली. जबरराम नवाराम प्रजापती (वय २९, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापती यांचे डांगे चौक, थेरगाव येथे मोबाइल दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता प्रजापती यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आतील दोन लाख ८८ हजार रुपयांचे २८ मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.