४ महिने जमिनीत पुरून ठेवले मृतदेह; १९ वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्व सदस्यांची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 19:19 IST2021-06-20T19:14:23+5:302021-06-20T19:19:22+5:30
19-Yr-Old Youth Kills Family :पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आसिफने आपला गुन्हा कबुल केला. त्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये हे खळबळजनक कृत्य केलं.

४ महिने जमिनीत पुरून ठेवले मृतदेह; १९ वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्व सदस्यांची केली हत्या
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे थरारक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे. त्यानंतर सर्वांचे मृतदेह घराजवळच जमिनीखाली पुरले. पश्चिम बंगालच्या मालदा येथे कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर वडील, आई, बहीण आणि आजीच्या हत्येप्रकरणी १९ वर्षीय तरूणाला कालियाचक पोलिसांनीअटक केली होती.
आपल्या कुटुंबाची हत्या करुन घराजवळ जमिनीत पुरणाऱ्या आरोपीचं नाव आसिफ मोहम्मद असं आहे. तो १९ वर्षांचा आहे. त्याने घरातील आई-वडील, मोठी बहीण, आजी यांची हत्या केली. त्याने या सर्वांची हत्या केली तेव्हा त्याचा मोठा भाऊ घरात नव्हता. तो काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता. चार महिन्यांनी त्याचा भाऊ घरी आला तेव्हा त्याला संबंधित घटनेची माहिती मिळाली. त्याने तातडीने मालदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्याने आपल्या भावाच्या कृत्याची माहिती दिली. आरोपीचे नाव असिफ मोहम्मद असे आहे.
बंदुकीचा धाक दाखवून ५ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; ३ आरोपींना अटकhttps://t.co/dMsuBgagRH
— Lokmat (@MiLOKMAT) June 20, 2021
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य जाणून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराजवळ खोदकाम केलं तर तिथे काही मृतदेह आढळले. पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आसिफने आपला गुन्हा कबुल केला. त्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये हे खळबळजनक कृत्य केलं. त्याने सुरुवातीला जेवणात गुंगीचं औषध टाकलं. त्यानंतर सर्वांचा गळा दाबून हत्या केली. आरोपीने नंतर घराजवळ सर्व मृतदेह पुरले होते.