Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:25 IST2025-06-03T11:19:32+5:302025-06-03T11:25:36+5:30

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या.

17-Year-Old TikTok Star Sana Yousuf Shot Dead In Islamabad, Attacker Escapes After Entering Home | Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

Sana Yousuf Shot Dead : पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षांची सोशल मीडिया स्टार आणि टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. २ जूनच्या रात्री तिच्या इस्लामाबादच्या सेक्टर जी-१३ मधील घरात तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सनावर अतिशय जवळून गोळी चालवली. हा हल्लेखोर तिच्या घरात पाहुणा म्हणून आला होता. सनावर गोळी झाडून तो तिथून लगेच पसार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेच्या काही वेळ आधीच सना घराबाहेर उभी राहून या हल्लेखोराशी बोलत होती. 

नेमकं काय झालं?

या हत्येचा घटनाक्रम सांगताना पोलीस म्हणाले की, एका अज्ञाताने घरात प्रवेश केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. सनाला दोन गोळ्या लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाकिस्तान इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सनावर गोळ्या झाडणारा व्यक्ती तिच्या परिचयातील असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

का झाली सनाची हत्या? 
या हत्येमागचा उद्देश अजूनही समोर आलेला नाही. वैयक्तिक वाद, सामाजिक तणाव किंवा अशाच तत्सम कारणावरून सनाची हत्या झाली असावी का, याचा तपास पोलीस करत आहेट. मात्र, यावर अद्याप पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

कोण होती सना यूसुफ?

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील चित्राल भागात राहणारी सना यूसुफ टिकटॉकवर प्रसिद्ध होती. सोशल मीडियावर देखील तिची मोठी लोकप्रियता होती. तिला इन्स्टाग्रामवर तब्बल चार मिलियन लोक फॉलो करत होते. तिच्या मृत्यूने आता सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

Web Title: 17-Year-Old TikTok Star Sana Yousuf Shot Dead In Islamabad, Attacker Escapes After Entering Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.