'सुंदर मुलांना बघून आकर्षित होतो, मुलासोबतच लग्न करायचं होतं' लिहून अल्पवयीन मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 11:43 IST2021-03-03T11:34:24+5:302021-03-03T11:43:06+5:30
मृतकाजवळ एक सुसाइड नोट सापडली असून ज्यात त्याने लिहिले की, त्याला मुलासोबत लग्न करायचं होतं. मुलीसोबत नाही.

'सुंदर मुलांना बघून आकर्षित होतो, मुलासोबतच लग्न करायचं होतं' लिहून अल्पवयीन मुलाची आत्महत्या
यूपीच्या ललितपूर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून सर्वांनाच धक्का बसलाय. इथे गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. कारण समोर आलं की, मुलाच्या घरातील लोक त्याचं लग्न लावून देण्याची तयारी करत होते. पण त्याला मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. मृतकाजवळ एक सुसाइड नोट सापडली असून ज्यात त्याने लिहिले की, त्याला मुलासोबत लग्न करायचं होतं. मुलीसोबत नाही. पण असं होऊ शकत नाही म्हणून तो आत्महत्या करत आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या वडिलांसोबत दुकानात काम करत होता. घरातील लोक सतत त्याच्या लग्नाबाबत चर्चा करत होते. आणि तो सतत लग्नाला नकार देत होता. गेल्या सोमवारी तो दिवसभर दुकानात बसला. सायंकाळी घरी आला आणि जेवण करून ९ वाजता झोपायला गेला. (हे पण वाचा : Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...)
मंगळवारी सकाळी तो बराच उशीर झाला तरी बाहेर आला नाही. ७ वाजता दरम्यान त्याच्या वडिलांनी रूमचा दरवाजा वाजवला. पण आतून काहीच आवाज न आल्याने त्याच्या वडिलांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना मुलाचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. त्याने साडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळ एक सिलेंडरही मिळालं जे खाली पडलं होतं. असं मानलं जात आहे की, यावर चढूनच त्याने फाशी घेतली असावी. (हे पण वाचा : दारू पीत असताना 'ती'ने बॉयफ्रेंड इम्रानचा विषय काढला; 'लोढा'तील प्रकरणात नोकराने हत्या केली)
'सुंदर मुलांना बघून आकर्षित होतो'
मीडिया रिपोर्टनुसार सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलाचा मृतदेह खाली काढला. यावेळी मृतकाजवळ एक सुसाइड नोटही मिळाली. त्यात त्याने लिहिले होते की, त्याला कोणत्याही मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. त्याने लिहिले होते की, तो एक सुंदर मुलगा आणि त्याला मुलासोबतच लग्न करायचं होतं. त्याने असंही लिहिलं की, तो एक मुलगा तर आहे ज्याच्यात मुलींसारखी लक्षणे आहेत. सुंदर मुले बघून तो त्यांच्याकडे आकर्षित होतो. आणि त्याला मुलासोबतच लग्न करायचं आहे. पण असं होऊ शकलं नाही म्हणून तो आत्महत्या करत आहे.
घरच्यांना काहीच माहीत नव्हतं
मृतकाच्या काकाने सांगितले की, त्याने सुसाइड नोटमध्ये जे लिहिलं त्याबाबत कुणाला काहीच कल्पना नव्हती. मृत मुलगा हा दोन भाऊ आणि एक बहिणीमध्ये सर्वात मोठा होता. तो नेहमीच लहान भावाचं लग्न करून द्या असं म्हणत होता. मोठ्या मुलाच्या आत्महत्येने संपूर्ण परिवाराला धक्का बसला आहे.