Video : Shocking revelation in Ayesha suicide case: Something he was doing in front of wife ... | Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...

Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...

ठळक मुद्देमोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी रात्री आरिफला पाली येथून अटक करण्यात आली.

गेल्या शनिवारी अहमदाबादमधील साबरमती नदीत २३ वर्षीय आयशाने उडी मारुनआत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आयशाने एक हसत आयुष्य संपवताना व्हिडिओही बनविला होता. आता आयशाच्या हास्यामागील वेदना वकीलांच्या माध्यमातून उघडकीस आल्या.आयशाचे वकील जफर पठाण यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, २३ वर्षीय आयशाचे राजस्थानातील जलोर येथे राहणाऱ्या आरिफशी लग्न झाले होते. राजस्थानातील एका मुलीशी आरिफचे प्रेमसंबंध होते. आरिफ आयशासमोर व्हिडिओ कॉलवर प्रेयसीशी बोलत असे. तो तिच्या मैत्रिणीवर पैसे खर्च करत असे आणि म्हणूनच तो आयशाच्या वडिलांकडून पैशाची मागणी करत असे.


वकील म्हणाले- लग्नाच्या २ महिन्यांनंतरच आयशाचा संघर्ष सुरू झाला
साबरमती रिव्हरफ्रंटवर आयशाने बनवलेल्या व्हिडिओने लोकांना हैराण केले आहे, असे जफर स्पष्ट करतात. पण वास्तविकता अशी आहे की, तिच्या लग्नाच्या २ महिन्यांनंतर आयशाचा संघर्ष सुरू झाला. आरिफने स्वत: आयशाला सांगितले की, त्याचे दुसर्‍या मुलीवर प्रेम आहे. असे असूनही, आयशा तिच्या गरीब आई-वडिलांचा अब्रू चव्हाट्यावर न आणण्यासाठी लढत राहिली. ती प्रत्येकक्षणी नवीन समस्येतून गेली, परंतु गप्प राहिली. तिच्यासाठी तिच्यासमोर पतीचे प्रेयसीशी बोलणं यापेक्षा आणखी काय वाईट असू शकते.

आयशाने शेवटपर्यंत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला
आयशाच्या वकिलाने सांगितले की, आयशा एक हुशार मुलगी होती. अभ्यासाव्यतिरिक्त ती घरातील प्रत्येक कामात हुशार होती. लहानपणापासूनच तिने ज्या प्रकारे घरगुती जबाबदाऱ्या हाताळल्या त्याच प्रकारे आपल्या सासरच्या घरातही तिने तसे प्रयत्न केले. आपल्या परिवाराला त्रास होऊ नये म्हणून तिने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या वेळी आयशाच्या वडिलांनी मुलीला आवश्यक असलेली सर्व वस्तू दिल्या, पण आयशाचे पती आणि सासू-सासरे समाधानी नव्हते.

तणावामुळे गर्भाशयात मुलाचा मृत्यू झाला
दरम्यान, आरिफने एकदा आयशाला अहमदाबादला सोडल्याची माहितीही समोर आली आहे. त्यावेळी आयशा गर्भवती होती. तुम्ही मला दीड लाख रुपये दिले तर मी आयशाला माझ्याबरोबर घेऊन जाईन, असे आरिफने म्हटले होते, असा आरोप परिवाराने केला आहे.

गर्भवती असताना आरिफच्या वागण्यामुळे आयशा चक्रावून गेली होती. ती नैराश्यात आली. तणावामुळे, तिला बराच रक्तस्त्राव होऊ लागला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली, परंतु तिच्या जन्मला येणाऱ्या मुलाला वाचविणे शक्य झाले नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, असे असूनही आरिफ आणि त्याच्या कुटुंबावर आमची हरकत नव्हती. ते सतत पैशांची मागणी करत राहिले.

आरिफला शिक्षा झाली पाहिजे: आयेशाचे वडील 
आयशाचे वडील लियाकत अली यांनी मंगळवारी सांगितले की, आरिफच्या वडिलांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी फोन आम्ही करायचो, परंतु त्यांनी माझा फोन कधीच उचलला नाही. माझी आयशा परत येणार नाही, परंतु तिच्या अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून दुसर्‍याच्या मुलीचे असे होणार नाही. माझी मुलगी आयशा आनंदी होती, पण हुंडाबळीनंतर तिचे आयुष्य नरकमय झाले. एकदा सासरच्यांनी तिला तीन दिवस अन्नही दिले नाही.

आयशाच्या पतीला पाली येथे अटक
गुजरात पोलीस जलोरमधील आरिफच्या घरी पोहोचले, तेव्हा कुटुंबीयांनी सांगितले की, तो लग्नाला गेला आणि कुठेतरी गेला होता. यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी रात्री आरिफला पाली येथून अटक करण्यात आली.

 

राजस्थान के जालौर में रहने वाले आरिफ पर आयशा को खुदकुशी के लिए उकसाने का आरोप है। उसे सोमवार रात पाली से गुजरात पुलिस ने गिरफ्तार कर लिया।

 

Web Title: Video : Shocking revelation in Ayesha suicide case: Something he was doing in front of wife ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.