१७ वर्षीय मुलाने ३५ वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार, पैसेही उकळले आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 13:20 IST2021-08-03T13:17:44+5:302021-08-03T13:20:13+5:30

Crime News: एका ३५ वर्षीय महिलेने १७ वर्षीय मुलावर विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

A 17-year-old boy raped a 35-year-old woman | १७ वर्षीय मुलाने ३५ वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार, पैसेही उकळले आणि मग...

१७ वर्षीय मुलाने ३५ वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार, पैसेही उकळले आणि मग...

रायपूर - छत्तीसगडमधील जशपूर येथील बगीचा ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ३५ वर्षीय महिलेने १७ वर्षीय मुलावर विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच या अल्पवयीन मुलाने हजारो रुपयेसुद्धा उकळल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार बगीचा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. या तक्रारीत ही महिला म्हणाली की, सरगुजा जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलाची तिच्याशी ओळख होती. हे दोघेही फोनवरून एकमेकांशी बोलत असत. यादरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या मुलाने विवाहाचे आमिष दाखवत या महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच हा मुलगा या महिलेकडून वेळोवेळी पैसेही उकळले होते. 
दरम्यान, ही महिले या अल्पवयीन मुलाला जेव्हा लग्नासाठी विचारत असे तेव्हा तो हा विषय टाळत असे. त्यानंतर या महिलेला टाळण्यासाठी एक काल्पनिक गोष्ट रचली. या महिलेचा त्याला फोन आला की तो स्वत:चाच छोटा भाऊ असल्याचे सांगून महिलेशी बोलू लागला. दरम्यान, त्याने त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 
मात्र हा मुलगा जिवंत असल्याचे समजल्यानंतर ही महिला त्याच्यापर्यंत पोहोचली. तसेच त्याच्याकडे विवाह करण्यासाठी आग्रह धरू लागली. मात्र या मुलाने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. याबाबत बगिचा पोलीस ठाण्याचे प्रभारी एसआर भगत यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.   

Web Title: A 17-year-old boy raped a 35-year-old woman